लच्छा पराठा | Lachha paratha recipe in marathi

  • 1 कप गव्हाचे पीठ 
  • 1 कप मैदा
  • 1/2 कप दूध
  • चिमुटभर बेकिंग सोडा
  • तेल
  • मीठ 
  • कोथिंबीर (बारीक चिरलेली )
कृती :
  1. एका भांड्यात सर्व साहित्य गव्हाचे पीठ, मैदा, बेकिंग सोडा, कोथिंबीर, आवश्यक तेवढे दूध आणि चवीपुरते मीठ घालुन कणिक चांगली मळुन घ्यावी. 
  2. कणिक अर्धा तास झाकून भिजत ठेवावे. 
  3. आता कणकेची पातळ चपाती बनवुन घ्या  नंतर सुरीने ५ सेमी रुंदीच्या पट्ट्या कापाव्यात. त्याची सुरळी (गुंडाळी) करावी आणि त्याचा गोळा बनवावा.
  4. lachchha paratha
  5. नंतर आपण चपाती करतो तशी लाटून तव्यावर छान दोन्ही बाजूने भाजून घ्या. तूप, तेल किंवा बटर तुमच्या आवडीनुसार भाजताना लावावे.
गरमागरम लच्छा पराठा, छोले सोबत सर्व्ह करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या