Zunka bhakar recipe in marathi | झुणका भाकर


झुणका हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. हा डाळीचे पीठ खरपूस व घट्ट शिजवून बनवतात. पातळ बनवल्यास त्याला पिठले म्हणतात. पिठले किंवा झुणक्यात कांदा व मिरची हमखास असते. झुणका बहुधा भाकरीसोबत तर पिठले भाताबरोबर खातात. खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी प्रसिद्ध आहे. 

साहित्य :
झुणका बनवण्यासाठी :
  • १ वाटी बेसन
  • १ चमचा मोहरी
  • १/२ चमचा जिरे
  • १ चमचा लसूण आणि आले पेस्ट 
  • १ चमचा धनिया पावडर
  • १ चमचा हळद
  • २-३ हिरव्या मिरच्या किंवा १ चमचा लाल तिखट
  • १ कांदा चिरलेला 
  • १ टोमॅटो चिरलेला 
  • ४-५ कढीपत्ताची पाने 
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा तेल
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
कृती :

झुणका बनवण्याच्या २ पद्धती आहेत -

पद्धत १ :
  1.  बेसन पीठात एक कप पाणी घालून गुळगुळीत पेस्ट बनवा. 
  2. आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे टाका . त्यात लसूण पेस्ट आणि आले पेस्ट घाला. 
  3. चिरलेला कांदा घाला. कांदा हलका गुलाबी होईस्तोवर तळा. कढीपत्ता घाला. 
  4. आता हळद आणि तिखट किंवा चिरलेली मिरची घाला. 
  5. टोमॅटो घाला आणि २ - ३ मिनिटे शिजवा. 
  6. आता त्यात बेसन पीठ मिश्रण, मीठ घालून एक कप (किंवा जास्त) पाणी घालून चांगले मिक्स करा.
  7. सतत चमचा फिरवत रहा. अणि उकळी येऊ दया.
  8. कोथिंबीर, कांदा आणि भाकरी बरोबर सर्व्ह करा.

पद्धत २ :
  1. एक कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे घाला. त्यात लसूण पेस्ट आणि आले पेस्ट घाला.
  2.  चिरलेला कांदा घाला. कांदा हलका गुलाबी होईस्तोवर तळा. 
  3. कढीपत्ता घाला. 
  4. आता हळद आणि चिरलेली मिरची किंवा तिखट घाला.
  5. टोमॅटो घाला आणि २-३ मिनिटे शिजवा. 
  6. तीन कप पाणी आणि मीठ घालून उकळी आणा. 
  7. आता बेसन पीठ घाला आणि चांगले ढवळावे (सगळ्या गाठी नाहीश्या होईपर्यंत ढवळावे). आणि ४-५ मिनिटे शिजवा. 
  8. कोथिंबीर, कांदा आणि भाकरी बरोबर सर्व्ह करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या