घरगुती पनीर रेसिपी | Homemade Paneer recipe in marathi

 आता घरीच बनवा बाजारात मिळणारे पनीर सोप्या पद्धतीने -

घरगुती पनीर रेसिपी | Homemade Paneer recipe in marathi
घरगुती पनीर रेसिपी | Homemade Paneer recipe in marathi

साहित्य :

  • १ लिटर दूध 
  • २ लिंबं 
  • १ कप पाणी 
कृती :
  1. एका मोठ्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. 
  2. लिंबाचा रस काढून १ कप पाण्यात मिसळा. 
  3. दूध उकळल्यास चमच्याने २-३ मिनिटे ढवळत राहा आणि गॅस बंद करा. 
  4. आता लिंबाचे मिश्रण थोडे थोडे उकळलेल्या दुधात ओतत राहा आणि दूध चमच्याने एकाच दिशेने हलवत राहा. मग दूध फाटते (नासते). 
  5. नंतर एका चाळणीवर ओला सुती कपडा ठेवा आणि त्यावर दूध ओता. वरून थंड पाणी टाका. 
  6. सगळे पाणी पिळून काढा. त्याच्यावर जड वस्तू ठेवा जेणेकरून सर्व पाणी निथळून जाईल.
  7. ३-४ तासानंतर त्याच्या वड्या  पाडा. पनीर फ्रिज मध्ये ठेऊन तुम्हाला हवे तेंव्हा वापरू शकता. 
टीप :
लिंबाऐवजी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. 

घरगुती पनीर रेसिपी | Homemade Paneer recipe in marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या