मेथीची भाजी | methichi bhaji

मेथीची भाजी  

मेथीची भाजी  | methichi bhaji
मेथीची भाजी  | methichi bhaji


साहित्य :

  • १ जुडी मेथी 
  • १/२ वाटी मुगाची दाळ 
  • १ चमचा लसूण पेस्ट 
  •  २-३ हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट 
  • १/४ चमचा हळद  
  • जिरे 
  • मोहरी 
  • चवीपुरते मीठ 
  • तेल 
कृती :
  1. मेथी निवडून घ्यावी. निवडलेली मेथी धुवून घ्यावी. मुगाच्या दाळीमध्ये पाणी घालून ५-६ मिनिटे भिजायला ठेवा.
  2. मिरचीचा ठेसा वाटून घ्यावा. 
  3. आता एका कढईत तेल गरम करून घ्यावे. त्यात मोहरी जिरे टाकावे. नंतर त्यात लसूण पेस्ट घालून तळून घ्यावे. मिरचीचा ठेसा किंवा लाल तिखट, हळद, मुगाची दाळ (मुगाच्या दाळीमधले पाणी काढावे) घालावे. 
  4. नंतर त्यात मेथीची भाजी आणि मीठ घालून मिसळावे आणि झाकण ठेवून एक वाफ होऊ द्यावे आणि नंतर गॅस बंद करावा. 
  5. चपाती किंवा भाकरी सोबत खायला द्या मेथीची भाजी. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या