बिस्कीट चॉकोलेट केक | Biscuit Chocolate cake recipe in marathi

साधा आणि सोपा बिस्कीट पासून बनवलेला चॉकोलेट केक step by step - 

बिस्कीट चॉकोलेट केक | Biscuit Chocolate cake recipe in marathi
बिस्कीट चॉकोलेट केक | Biscuit Chocolate cake recipe in marathi

साहित्य :

  • ६ बॉरबॉन बिस्कीटे (Bourbon biscuits) किंवा चॉकोलेट चे कोणतेही बिस्कीट 
  • १ कप दूध 
  • १ चमचा बेकिंग पावडर 
  • १/२ चमचा सोडा 
  • २ चमचे साखर (आवडीनुसार) 
  • तूप किंवा बटर 
  • १ चमचा मैदा 
सजावटीसाठी (पर्यायी)
  • ओरिओ बिस्कीट (Oreo biscuit)
  • किट-कॅट चॉकोलेट (Kitkat chocolate)
  • डैरीमिल्क चॉकोलेट (dairymilk chocolate)
  • जेम्स (Gems)
कृती :

  1. बॉरबॉन बिस्कीटे आणि साखर मिक्सर मध्ये वाटुन बारीक पावडर करून घ्यावे.(बिस्कीट आधीच गोड असते त्याप्रमाणे साखर वापरावे )
  2.  एका भांड्यात बिस्कीट आणि साखरची पावडर घेऊन त्यात दूध घालुन चांगले मिक्स करावे. मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. नंतर त्यात बेकिंग पावडर आणि सोडा टाकुन चांगले मिसळुन घ्या. 
  3. कुकर गरम करायला ठेवा. कुकर ची शिट्टी काढून घ्यावी आणि कुकर मध्ये स्टॅन्ड ठेवावा.
  4. केकच्या भांड्याला तूप लावून घ्यावे नंतर त्यात मैदा टाकून भांडे हलवून घ्यावे. मैदा टाकल्यामुळे केक भांड्याला चिकटणार नाही. 
  5. आता केकच्या भांड्यात केक चे मिश्रण टाकावे आणि कुकर मध्ये ठेवून २०-२५ मिनिटे केक बेक होऊ द्यावे. २० मिनिटांनंतर केक चेक करत राहा. 
  6. चॉकोलेट केक थंड झाल्यास त्यावर हवे तसे सजावट करा. 

बिस्कीट चॉकोलेट केक | Biscuit Chocolate cake recipe in marathi
बिस्कीट चॉकोलेट केक | Biscuit Chocolate cake recipe in marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या