क्रिस्पी कॉर्न | Crispy Corn recipe in marathi

चटपटीत क्रिस्पी कॉर्न -

क्रिस्पी कॉर्न | Crispy Corn recipe in marathi
 क्रिस्पी कॉर्न | Crispy Corn recipe in marathi

साहित्य :

  • २ कप मका 
  • ४ चमचे मक्याचे पीठ 
  • १/२ चमचा जिरे पावडर 
  • १/२ चमचा चाट मसाला 
  • १/२ चमचा लाल तिखट 
  • १ चमचा कांदयाची पात बारीक चिरलेली 
  • अर्धा लिंबू 
  • तेल 
  • पाणी 
  • चवीपुरते मीठ 
कृती :

  1. एका भांडयात मका, मीठ आणि पाणी घेऊन ५-६ मिनिटे उकडुन घ्यावे. 
  2. मका उकडल्यास त्यामधले सगळे पाणी निथळुन सुती कपड्यावर ठेवुन कोरडे करावे. 
  3. उकडलेल्या मकामध्ये मक्याचे पीठ आणि मीठ घालुन मिसळुन घ्यावे. 
  4. एका कढईमधे तेल गरम करावे. तेल गरम झाल्यास मक्याचे मिश्रण तळावे. 
  5. आता एका भांड्यात तळलेले मका, जिरे पावडर, चाट मसाला, लाल तिखट, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कांदयाची पात आणि चवीपुरते मीठ टाकून सगळे एकजीव करून घ्यावे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या