पोहे वडे बनवण्याची सोपी पद्धत | Pohe wade recipe

अगदी सोपी आणि त्वरीत होणारे पोहे वड्याची पाककृती -

पोहे वडे बनवण्याची सोपी पद्धत |  Pohe wade recipe
 पोहे वडे बनवण्याची सोपी पद्धत |  Pohe wade recipe

साहित्य :

  • २ कप पोहे 
  • १ कप दही 
  • १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला )
  • १ चमचा लाल तिखट 
  • १/२ चमचा गरम मसाला 
  • चवीपुरते मीठ 
  • कोथिंबीर ( बारीक चिरलेली )
  • तेल तळण्यासाठी 
  • टोमॅटो सॉस 

कृती :

  1. पोहे ५-१० मिनिटे भिजवून घ्यावे . 
  2. पोहे भिजले की त्यात दही , बारीक चिरलेला कांदा , लाल तिखट , गरम मसाला , कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ टाकून चांगले मिसळून घ्यावे. पाणी घालु नये. 
  3. आता त्याचे चपटे गोळे करून घ्या. 
  4. एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यास गॅस मेडीयम आचेवर ठेवा आणि तेलात वडे टाकून हळुहळु वडे ताळुन घ्या . वडे तळायला १०-१५ मिनिटे लागतील. वडे सोनेरी रंगाचे झाल्यास वडे काढून घ्या. 
  5. टोमॅटो सॉस सोबत खायला द्या गरम गरम पोहे वडे. 

Read more Recipes : वडापाव कोल्हापुरी कटवडा । तिखट पुऱ्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या