खानदेशी भरीत | khandeshi bharit recipe

खानदेशी चमचमीत वांग्याचे भरीत -

खानदेशी भरीत | khandeshi bharit recipe
 खानदेशी भरीत | khandeshi bharit recipe

साहित्य :

  • ४-५ वांगे 
  • कांदा पात 
  • १/२ कप खिसलेले खोबरे 
  • ४-५ चमचे तीळ 
  • १ चमचा लसूण पेस्ट 
  • १ चमचा काळा मसाला 
  • १/२ चमचा हळद 
  • १/२ चमचे जिरे 
  • १/२ चमचा मोहरी 
  • १/२ कप शेंगदाण्याचे कुट (पर्यायी )
  • चवीपुरते मीठ 
  • तेल 
  • कोथिंबीर 
कृती :

  1. कांद्याची पात बारीक चिरून घ्यावे. 
  2. वांगे गॅस वर भाजुन घ्यावे. वांगे भाजले की त्याचे वरचे टरफल काढून वांगे क्रश करावे. 
  3. आता एका  कढईत तेल घ्यावे. तेल गरम झाल्यास त्यात मोहरी, जिरे, कांद्याची पात,लसूण पेस्ट टाकुन चांगले तळून घ्यावे. 
  4. नंतर त्यात खिसलेले खोबरे टाकून खोबरे लालसर होईपर्यंत तळून घ्यावे. आता त्यात तीळ, हळद , काळा मसाला आणि चवीपुरते मीठ घालावे. 
  5. आता त्यात क्रश केलेले वांगे, शेंगदाण्याचे कुट आणि कोथिंबीर टाकून चांगले मिसळून घ्यावे. 
  6. खानदेशी वांग्याचे भरीत तयार !!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या