चोको लावा केक | choco lava cake in mug recipe

choco lava cake in mug recipe
choco lava cake in mug recipe
साहित्य :

  • 1/4 कप मैदा
  • 1/4 कप साखर
  • 2 चमचे कोको पावडर
  • 1/2 चमचे बेकिंग पावडर
  • चिमूटभर मीठ
  • 3 चमचे बटर किंवा लोणी
  • 3 चमचे दूध
  • 1 अंडे (पर्यायी )
  • 1/4 चमचे व्हॅनिला एक्सट्रॅक्ट
  • चॉकलेट

कृती :
  1. एका कपामध्ये मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर एका भांड्यात चाळून घ्या. तिन्ही पदार्थ एकत्र करा.
  2. साखर मिक्सरमध्ये बारीक करा. 
  3. साखर, वितळलेले बटर, अंडे, मीठ हे सगळे मिश्रण मैदा,कोको पावडर आणि बेकिंग पावडर मध्ये मिसळून मिश्रण छान एकजीव करून घ्या. सगळे मिश्रण एकाच दिशेने फिरवत फेटून घ्या. आता सर्व मिश्रण एकजीव झाले की त्यामध्ये दूध टाका. पुन्हा एकदा फेटून घ्या. आता मिश्रणात व्हॅनीला इसेन्स मिसळा आणि पुन्हा फेटा.(चांगली पेस्ट होण्यासाठी अजुन पाणी किंवा दूध घालु शकता)
  4. आता पिठात चॉकलेटचे तुकडे मध्यभागी ठेवा (त्यावरही थोडेसे पीठ घाला).
  5. मायक्रोवेव्हमधे 2 मिनिट 30 सेकंद ठेवून बेक करुन घ्या.
  6. आइसक्रीम सोबत सव्ह्र करा चोको लावा केक.
Read more : 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या