पनीर टिक्का पाककृती मराठी मध्ये | Paneer Tikka recipe in marathi
Paneer Tikka |
साहित्य:
- 200 ग्रॅम पनीर
- 2 ते 3 लहान रंगीत भोपळी मिरच्या (लाल, हिरवा, पिवळा, केशरी)
- 2 ते 3 छोटे कांदे
- 5 चमचे दही
- 1 चमचा धणेपूड
- 1 चमचा जिरेपूड
- 1 चमचा लाल तिखट
- कसूरी मेथी(पर्यायी)
- 1 चमचा कॉर्नस्टार्च किंवा बेसन
- 1/4 चमचा हळद
- 1 चमचा आले-लसूण पेस्ट
- मिठ
- तेल
कृती:
- एका भांड्यात दही, कॉर्नस्टार्च, हळद, आले-लसूण पेस्ट, 1/2 चमचा धणेपूड, 1/2 चमचा जिरेपूड, मिठ, 1/2 चमचा लाल तिखट आणि चिमूटभर कसूरी मेथी हे सर्व साहित्य एकत्र करून त्यात पनीरचे दिड इंचाचे तुकडे मिसळुन 15 मिनीटे ठेवावे.
- कांदे, भोपळी मिरच्यांचे 1 इंचाचे चौकोनी तुकडे करावे.
- भाज्या चिरून झाल्या कि स्क्युअर स्टिक मध्ये 2-3 तुकडे भाज्या आणि 1 तुकडा पनीर असे ओवावे.
- आता 2 चमचा तेल, 1/2 चमचा धणेपूड, 1/2 चमचा जिरेपूड, 1/2 चमचा लाल तिखट, चिमूटभर मिठ, चिमूटभर कसूरी मेथी असे साहित्य एकत्र करून भाज्यांना अलगद हाताने किंवा ब्रशने लावावे.
- ओव्हन 2 ते 3 मिनीटे प्रिहीट करावे. तयार स्क्युअर्स ओव्हनसेफ प्लेटला तेल लावून त्यावर ठेवावे आणि साधारण 2 ते 4 मिनीटे बेक करावे.
- पनीर आणि भाज्या थोड्या ब्राऊन झाल्या कि ओव्हन बंद करून लगेच बाहेर काढाव्यात.
- जर ओव्हन नसेल तर मॅरीनेट पनीर तळून घ्यावे किंवा शालो फ्राय करावे आणि भाज्यांना तेल लावून कढईत मोठ्या आचेवर २ मिनीटे परतावे किंवा तंदूरमध्ये भाजून.
- स्क्युअर्स स्टिक वरील भाज्या आणि पनीर हलक्या हाताने प्लेटमध्ये काढाव्यात आणि गरमागरम पनीर टिक्का मसाला पुदीना चटनी सोबत सर्व्ह करावे.
टीप:
- जर लाकडी स्क्यूअर्स स्टिक वापरणार असाल तर 1/2 तास गार पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे ओव्हनमध्ये बेक करताना जळणार नाहीत.
- पनीरचे तुकडे खुपवेळ मॅरीनेट करू नयेत. मऊ पडतात आणि बेक केल्यावर वितळतात.
Read more recipes : पुदीना चटनी | आळु वडी | खांडवी | दाल-बाटी
0 टिप्पण्या