वडापाव रेसिपी | वडापाव | vadapav recipe in marathi language
वडापाव |
साहित्य:
- लादीपाव
- 4 शिजवलेले मोठे बटाटे
- 1 कप बेसन पिठ
- 4-5 हिरव्या मिरच्या
- 1 चमचा लसणींची पेस्ट
- 1 चमचा आले पेस्ट
- कडीपत्ता
- कोथिंबीर
- 1 चमचा लिंबाचा रस
- 1/2 चमचा मोहरी
- 1/2 चमचा जिरे
- चिमूटभर हिंग
- 1 चमचा हळद
- चिमूटभर खायचा सोडा
- चवीपुरते मीठ
- तळण्यासाठी तेल
कृती:
- शिजवलेले बटाटे व्यवस्थित कुस्करून घ्यावे (गुठळ्या ठेवून नये).
- कढईत २ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, अर्धा चमचा हळद, कडीपत्ता, मिरच्या आणि नंतर आले-लसूण पेस्ट घालावे. नंतर त्यात कुस्करलेला बटाटा घालून परतावे. चवीपुरते मीठ घालावे. मीठ आणि फोडणीचे तेल बटाट्याला व्यवस्थित लागेल असे चांगले मिक्स करावे. लिंबूरस घालावा. तयार भाजीचे लिंबाएवढे अथवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवून ठेवा.
- बेसन पिठात अर्धा चमचा हळद, सोडा आणि चवीपुरते मिठ घालुन भिजवावे. पिठ अगदी पातळ किंवा अगदी घट्ट भिजवू नये.
- कढईत तेल गरम करावे. तळताना वडा तेलात पुर्ण बुडेल एवढे तेल कढईत घ्यावे. तेल व्यवस्थित तापू द्यावे.
- भिजवलेल्या पिठात तयार भाजीचा एक गोळा बुडवून तेलात सोडावा आणि गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळावेत.
टोमॅटो सॉस, तळलेल्या हिरव्या मिरच्या, चटणी आणि पावाबरोबर गरमागरम वडापाव सर्व्ह करावे.
Read more Recipes : कोल्हापुरी कटवडा | मिसळ पाव | दाल बाटी चूरमा
0 टिप्पण्या