रवा ढोकला | Rava dhokla recipe in marathi |
साहित्य :
- 2 कप रवा
- 1/2 कप बेसन
- 2 कप आंबट ताक
- 1/4 चमचा सोडा
- 2 चमचे आल, मिर्ची, लसूण पेस्ट
- चवीपुरते मीठ
- तेल
- 1 चमचा मोहोरी
- 1 चमचा जीरे
- चिमुटभर हिंग
- कढ़ी पत्ता
कृती :
- रवा आणि बेसन एकत्र करून त्याला आंबट ताकामधे भिजवून रात्रभर आंबवन्यासाठी ठेवा.
- दुसऱ्या दिवशी त्यात आल, मिर्ची,लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, थोडे तेल आणि सोडा टाकुन चांगले मिक्स करून घ्या.
- भांड्याला तेल लावून त्यात पीठ घाला.
- 15-20 मिनिटे ढोकळा वाफवून घ्या बाहेर काढून थंड होउ द्या.
- तेलाची फोडणी त्यात मोहोरी, जीरे, हिंग, कढी पत्ता घालुन ढोकळावर टाका.
- ढोकळा कापून घ्या.
आपला स्वादिष्ट आणि चवदार रवा ढोकळा तयार आहे.
Read more recipes - गुजराती खांडवी | रगडा पॅटिस | कटोरी चाट | ब्रेड पिझा
0 टिप्पण्या