खमण ढोकळा | khaman dhokla recipe in marathi

खमण ढोकळा | khaman dhokla recipe in marathi
खमण ढोकळा | khaman dhokla recipe in marathi
साहित्य:
ढोकळासाठी :
  • 1 कप बेसन 
  • 2 चमचे रवा
  • 1 कप ताक( पर्यायी )
  • 1 चमचा साखर
  • 1/2 चमचा मिरची पेस्ट
  • 1/2 चमचा आले पेस्ट
  • 1 चमचा हळद
  • 2 चमचे इनो
  • 1 चमचा लिंबाचा रस
  • 1 चमचा तेल
  • चवीपुरते मिठ

फोडणीसाठी : 
  • 1 चमचा तेल
  • 1/2 चमचा मोहोरी
  • 1/2 चमचा तीळ 
  • 2 हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
  • 1/2 लहान चमचा हिंग
  • कोथिंबीर 
  • 1 चमचा लिंबाचा रस
  • 1 चमचा साखर
  • 2 चमचे पाणी
कृती :
  1. एका भांड्यात बेसन पिठ, रवा, साखर, मिरची पेस्ट, आले पेस्ट, हळद, लिंबाचा रस, तेल, चवीपुरते मीठ हे सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात ताक किंवा पाणी घालुन एकजीव मिश्रण तयार करुन घ्यावे.
  2. एक मध्यम खोलीचा पसरट भांड घ्यावे. त्यात अर्ध्यापेक्षा किंचीत कमी भरेल एवढे पाणी उकळत ठेवावे. त्या भांड्यामध्ये राहिल एवढ्या उंचीचे ढोकला बनवण्यासाठी भांडे घ्यावे त्याला तेलाचा हात लावून घ्यावे.
  3. जर ढोकळा कूकरमध्ये करत असाल तर कूकर ची शिट्टी काढून घ्यावी किंवा फक्त कूकरच्या झाकणाला पंचा बांधून घ्यावा व ते झाकण नुसतेच वर ठेवावे, कूकर बंद करू नये. किंवा कूकरच्या झाकणापेक्षा जाडसर थाळीला पंचा बांधून ती कूकरवर झाकणासारखी ठेवावी.
  4. आता मिश्रणात इनो घालून पटापट एकाच दिशेने अंदाजे 10-15 सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते. लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून पाणी उकळत ठेवलेल्या भांड्यामध्ये ठेवावे वरून झाकण ठेवावे. मध्यम आचेवर 15 ते 20 मिनीटे वाफ काढावी. वाफ काढताना झाकण अजिबात उचलू नये. यासाठी अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी ठेवावे. पाणी कमी पडले आणि सर्व पाणी संपले तर ढोकळा भांड्याच्या तळाला चिकटून करपू शकतो.
  5. फोडणीसाठी कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, तीळ, हिरव्या मिरच्या, हिंग आणि कोथिंबीर घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होवू द्यावी. एका वाटीत पाणी, लिंबाचा रस, साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
  6. ढोकळा शिजत ठेवलेला गॅस 15 मिनीटांनी बंद करावा. 1-2 मिनीटांनी भांडे बाहेर काढावे. ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी.

हा ढोकळा टोमॅटो सॉस किंवा हिरव्या तिखट चटणी बरोबर मस्त लागतो.
टिप :
हा ठोकळा इडली पात्रामधे मधेसुद्धा करू शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या