एकादशी, उपवास स्पेशल शाबुदाणा वडा पाककृती मराठीमधे
शाबुदाणा वडा पाककृती मराठीमधे | Shabudana Vada recipe in marathi |
साहित्य:
- 1 कप शाबुदाणे
- 2 बटाटे
- 1/2 कप शेंगदाण्याचा कूट
- 1 चमचा जीरे
- 3-4 हिरव्या मिरच्या(आवाडीनुसार )
- 2 चमचे लिंबाचा रस
- चवीपुरते मीठ
- तेल
कृती :
- शाबुदाणे झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजत ठेवावेत. बटाटे उकडून घ्यावे
- उकडलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
- मिरच्या बारीक चिरून किंवा वाटून घ्याव्यात.
- भिजवलेले शाबुदाणे, बटाटे, मिरच्या, जीरे, शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे.
- मिश्राणाचे छोटे गोळे तयार करावेत. कढईत तेल गरम करावे आणि वडे गोल्डन ब्राउन होई पर्यंत तळावेत.
- आपली स्वादिष्ट आणि चवदार उपवासाचे शाबुदाणा वडे तयार आहेत.
टीप :
- शाबुदाणा जास्त भिजवला तर वडे तेलकट होतात.
- शाबुदाणा वड्यात पाणी जास्त राहिले किंवा बटाटे चिकट असेल तर मिश्रण ओलसर होते त्यामुळे वडे तळताना ते फुटतात. अश्या वेळेस शाबुदाणा मिश्रणात थोडे शेंगदाण्याचे कुट मिक्स करावे.
Read more Recipes : वडापाव | कोल्हापुरी कटवड़ा | तिखट पुऱ्या | समोसा
0 टिप्पण्या