VaranPhal/वरण फळ |
चकोलिया , ज्याला वरण फळ किंवा दाळ ढोकली देखील म्हणतात.
साहित्य :
साहित्य :
- 1 कप गव्हाचे पीठ
- 1/2 कप तूर दाळ किंवा मूग दाळ
- 1 चमचा मोहरी
- 1/2 चमचा जिरे
- 1 चमचा लसूण आणि आले पेस्ट
- 1 चमचा धनिया पावडर
- 1 चमचा हळद
- 2 चमचे खोबरं खिसलेले
- 1 चमचा काला मसाला
- चवीनुसार मीठ
- 1 चमचा तेल.
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- पाणी
- तुप
- वरणफळ पीठ तयार कराण्यासाठी एका भांड्यात गव्हाचे पीठ, चिमुटभर मीठ, 1 चमचा तेल आणि पाणी मिसळून चपातीच्या पिठासारखे कणिक माळुन घ्या. 5-10 मिनिटे झाकून ठेवा.
- तोपर्यंत, कुकरमध्ये तूर दाळ आणि पाणी घालुन, 2-3 शिट्या द्या आणि नंतर मंद आचेवर १० मिनिटे ठेवा.
- उकडलेल्या दाळीमध्ये हळद आणि मीठ घाला आणि एकजीव करून घ्या.
- एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे घाला. नंतर लसूण पेस्ट घालावी, लसूण फिकट होईपर्यंत तळा.
- आल्याची पेस्ट, खिसलेले खोबरं आणि काळा मसाला घाला.
- आता शिजलेली दाळ मिक्स करावे आणि एक कप (किंवा जास्त) पाणी घालावे. आणि उकळू द्यावे.
- आता कणकेची चपाती बनवून घ्या आणि सुरीच्या साहाय्याने १*१ इंच चौकोन कापून घ्या. आणि उकळत्या दळीमध्ये टाका. पुढील 8-10 मिनिटे शिजू द्या. तळाशी चिकटविणे टाळण्यासाठी दरम्यान ढवळत राहा.
- वरून कोथिंबीर आणि तूप टाकुन गरम गरम सर्व्ह करा.
0 टिप्पण्या