शेंगदाण्याचे लाडू | peanut ladoo recipe in marathi

ही पाककृती लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी हिवाळ्याच्या थंडीत सर्वात उत्तम आहार. या लाडूमध्ये गुळ व शेंगदाणे असतात म्हणूनच ते लोहाचा चांगला स्रोत आहे आणि
हेमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते. हे लाडू उपवासात पण खाऊ शकता आणि या लाडूच्या मिश्रणाने तुम्ही गोड शेंगदाणा पराठा देखील बनवू शकता. जर रेफ्रिजरेटरमध्ये संग्रहित केले असेल तर ते एका महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू शकेल. परंतु सर्व्ह करण्यापूर्वी 30 मिनिटांपूर्वी फ्रीजमधून काढुन बाहेर ठेवावे. 

साहित्य:
  • 1/2 कप शेंगदाणे .
  • 1  कप गूळ किसलेले 
  • 1 चमचा खसखस 
  • 1 चमचा वेलची पावडर 
  • 1/4 चमचे किसलेले जायफळ
  • चमचा तीळ
  • चमचा तूप
कृती :
  1. शेंगदाणे चांगले भाजुन घ्या.
  2. खसखस, जायफळ आणि तीळ भाजुन घ्या.
  3. मोठ्या मिक्सिंग भांड्यात सर्व कोरडे साहित्य भाजलेले शेंगदाणे,  खसखस, जायफळ आणि तीळ बारीक़ वाटुन घ्या. त्यात तूप, गूळ आणि वेलची पावडर मिसळुन एकजीव करून घ्या.  
  4. तुपाचे 1 ते 2 थेंब आपल्या हातात लावून लाडू वळुन घ्या.
  5. आरोग्यदायी आणि बनवण्यास सोपे शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत. हे लाडू बंद डब्यात ठेवावेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या