साहित्य -
- १ कप खोबऱ्याचे तुकडे
- १/२ कप शेंगदाण्याचे कूट
- १ चमचा बेसन
- १ चमचा मोहरी
- १/२ चमचा जिरे
- १ चमचा लसूण पेष्ट
- १/२ चमचा आले पेस्ट
- १ कांदा (चिरलेला )
- १ टोमॅटो (चिरलेला )
- ४-५ करी पाने
- १ चमचा धनिया पावडर
- १ चमचा हळद
- १ चमचा काला मसाला
- चवीनुसार मीठ
- 2 चमचे तेल
- कोथिंबीर बारीक चिरलेली
कृती :
- कढईत थोडे तेल घेऊन त्यात खोबऱ्याचे काप, चिरलेला कांदा आणि चिरलेला टोमॅटो घाला. ते चांगले भाजून घ्या आणी थंड झाल्यास मिक्सरमध्ये पेस्ट बनवा.
- आता एका भांड्यात बेसन, शेंगदाण्याचे कूट घ्या. त्यात हळद, मीठ आणि 1 कप पाणी घालून मिक्स करावे.
- एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे घाला. दोन्ही बियाणे तळाल्यास त्यात लसूण पेस्ट घालावी, लसूण फिकट होईस्तोवर तळून घ्यावे व नंतर आले पेस्ट घालावी
- आता कांदा, टोमॅटो, नारळाची पेस्ट घाला (चरण १ प्रमाणे).
- कढीपत्ता, धनिया पावडर आणि काला मसाला घाला.
- आता पावडर मिक्स घाला (चरण २ प्रमाणे). आणि उकळण्यासाठी ठेवा. उकळत्या नंतर १-२ कप पाणी घाला.
- पुढील ८-१० मिनिटे शिजू द्या. दरम्यान चमच्याणे ढवळत राहा जेणे करुण तलाशी चिटकणार नाही. वरुन कोथिंबीर टाका.
- भात किंवा चपाती बरोबर गरम-गरम सर्व्ह करा.
0 टिप्पण्या