chocolate cake recipe in marathi | चॉकलेट केक

chocolate cake recipe in marathi | चॉकलेट केक
चॉकलेट केक
चॉकलेट केक 
साहित्य:  
  • 2 वाटी मैदा 
  • अर्धी वाटी कोको पावडर
  • दीड वाटी साखर
  • 2 वाटी लोणी/बटर 
  • 2 चमचे बेकिंग पावडर
  • 3 अंडी
  • 1 चमचा व्हॅनीला इसेन्स  
  • अर्धा कप गार दुध 
कृती:
  1. मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर एका भांड्यात चाळून घ्या. तिन्ही पदार्थ एकत्र करा.
  2. साखर मिक्सरमध्ये बारीक करा. आता त्यामध्ये लोणी टाका. मिश्रण फेटून घ्या. साखर पूर्ण विरघळून लोणी आणि साखर एकजीव झाले पाहिजे. दुसर्या बाजूला अंडी वेगळी फेटून घ्या.
  3. फेटलेल्या अंड्यात फेटलेलं लोणी-साखर घालून सगळे पुन्हा मिश्रण एकत्रित रित्या फेटून घ्या.
  4. हे सगळे मिश्रण मैदा,कोको पावडर आणि बेकिंग पावडर मध्ये मिसळून मिश्रण छान एकजीव करून घ्या. सगळे मिश्रण एकाच दिशेने फिरवत फेटून घ्या. आता सर्व मिश्रण एकजीव झाले की त्यामध्ये दूध टाका. पुन्हा एकदा फेटून घ्या. आता मिश्रणात व्हॅनीला इसेन्स मिसळा आणि पुन्हा फेटा.
  5. बेकिंग भांड्याला आतल्या बाजूने लोण्याचा हात लावून घ्या आणि त्यामध्ये केकचे मिश्रण भांड्यात ओता. हाताने पसरून सपाट करून घ्या.
  6. ओव्हन 350 F तापमानाला प्रीहीट करा आणि 25 ते 30 मिनिटे बेक करा. केक भांड्याच्या कडा सोडायला लागला याचा अर्थ केक पूर्ण बेक झाला. 
  7. जर प्रेशर कूकर मधे केक बनवत असाल तर, प्रेशर कूकरमधील रींग आणि शिट्टी काढून ठेवावी. आणि प्रेशर कूकर झाकण लावून मोठ्या आचेवर गरम करण्यास ठेवावा. साधारण 8 ते 10  मिनीटे गरम करावा. कूकरमध्ये पाणी घालू नये. कोरडाच गरम करावा. 10  मिनीटानंतर कूकरची आच मध्यम करावी. गरम कूकरचे झाकण उघडून त्यात पकडीच्या सहाय्याने केकचे भांडे ठेवावे. झाकण लावावे आणि 35 ते 40 मिनीटे केक बेक करावा. 25 मिनीटे होईस्तोवर कूकर अजिबात उघडू नये. बेकिग करताना मधेमधे झाकण उघडल्यास कूकरच्या आतील तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही. साधारण 25 मिनीटांनी कूकरचे झाकण उघडावे. आता केक फुललेला दिसेल पण आतून शिजला नसावा. तरीही मध्यभागी टूथपिकने किंवा चाकूने टोचून पाहावे, जर ओलसर बॅटर लागले असेल तर अजून 10-12 मिनीटे केक बेक होवू द्यावा. 10-12 मिनीटांनी टूथेपिकने मध्यभागी टोचून पाहावे. जर टूथपिकला ओलसर बॅटर लागले नसेल आणि टूथपिक क्लिन बाहेर आली तर केक बेक झाला असे समजावे. केकचे भांडे पकडीच्या सहाय्याने बाहेर काढावा.
  8. केक पूर्ण थंड झाला कि, अलगद बाहेर काढून सर्व्ह करण्यासाठी तयार. मार्केट मध्ये रेडिमेड विविध फ्रूट नट्स आणि क्रिम देखील मिळते. केकवरुन ती सजवू शकता. 

Read more : 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या