Perfect jalebi recipe in Marathi |
साहित्य :
- 2 कप मैदा
- 1/2 चमचा तांदळाचे पीठ
- 1/2 चमचा बेकिंग पावडर
- 4 चमचे दही
- 1 कप गरम पाणी
- 1/2 चमचा केसर
- 3 कप साखर
- 1 चमचा लिंबू रस
- 1/2 चमचा इलायची पावडर
- अडीच वाटी पाणी
- तळण्यासाठी तुप किंवा तेल
कृती :
- मैदा, तांदळाचे पीठ, बेकिंग पावडर(खाण्याचा सोडा जास्त टाकु नका), दही आणि 1 कप गरम पाणी एका भांडयात टाकुन त्याला चांगल्या प्रकारे मिसळुन घ्या. मिसळल्यानंतर त्याला चांगले फेटुन घ्या. एक चमचा केसर पावडर टाका आणि मुलायम होईपर्यंत फेटा(अजून पाणी पाहिजे असेल त्यात टाका, पीठ जास्त पातळ करू नये). फेटल्यानंतर २-३ तास ठेउन दया. जिलेबी करण्यापुर्वी देखील एकदा फेटा.
- एका भांड्यात साखर आणि पाणी घेऊन चांगला घट्ट, एक तारी पाक तयार करा त्यात लिंबू रस घालावा. लिंबाचा रस साखरेच्या पाकाला कडक होउ देत नाही. आवश्यकतेनुसार तुम्ही त्यात लिंबाच्या रसाची मात्रा कमी जास्त करू शकता. चांगला पाक तयार होण्याच्या 1 मिनीटा आधी त्यात केसर आणि इलायची पावडर टाका.
- आता कढईत तेल किंवा तुप गरम करा आणि गोलाकार चकलीच्या आकाराच्या छोटया छोटया जिलेबी त्यात सोडा. जिलेबी तळताना मंद आचेवर तळल्यास जिलेबी कुरकुरीत होईल. एका वेळी काहीच जिलेबी तळा. जिलेबीला तोपर्यंत तळत राहा जोपर्यंत त्याचा रंग हलका सोनेरी होत नाही आणि ती कुरकुरीत होत नाही.
- तळल्यानंतर त्या जिलेबीला बाहेर काढा आणि किचन पेपर वर ठेवा जेणेकरून त्यातील तेल किंवा तुप निघुन जाईल आणि त्यानंतर साखरेच्या पाकात बुडवा. 4 ते 5 मिनीटे त्यात ठेवल्यानंतर बाहेर काढा.
- पाकातुन काढुन गरमागरम जिलेबी सर्व्ह करा.
0 टिप्पण्या