कलाकंद

कलाकंद
कलाकंद 
साहित्य: 
  • 1 लिटर दुध
  • 1/2 चमचा सायट्रिक ऍसिड किंवा एका लिंबाचा रस
  • 150 ग्राम खवा
  • 3/4 कप साखर
  • 1/2 चमचा वेलची पुड
  • बदाम 
कृती:
  1. दुध जाड बुडाच्या पातेल्यात गरम करत ठेवावे. दुध गरम झाले कि त्यात चिमटीचिमटीने सायट्रिक ऍसिड किंवा लिंबाचा रस घालून तळापासून ढवळावे. दुध फाटले कि सुती कपड्यावर पनीर गाळून घ्यावे.
  2. गाळलेले पनीर फडक्यातच असताना गार पाण्याने थोडे धुवून घ्यावे म्हणजे लिंबाची/ सायट्रिक ऍसिडची आंबट चव आणि वास निघून जाईल. गच्च पिळून पनीर लगेच काढून एका वाडग्यात ठेवून द्यावे.
  3. खवा आणि साखर एकत्र करून नॉनस्टिक भांड्यात मध्यम आचेवर गरम करत ठेवावे. साखर वितळली कि मिश्रण पातळ होईल. सतत ढवळत राहावे. ५ मिनिटांनी पनीर आणि वेलची पुड घालावी.
  4. पनीर घातल्यावरही ढवळत राहावे. मिश्रण आळून गोळा बनायला सुरुवात झाली कि लगेच ट्रेमध्ये किंवा परातीत मिश्रण जाडसर पण एकसमान पसरवावे. वरून बदमाचे काप घालावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

टीप:
पनीर ताजेच बनवावे. तसेच दुध फाटल्यावर गाळून, घट्ट पिळून लगेच पनीर वापरावा. पाणी निथळण्यासाठी खूप वेळ टांगून ठेवू नये.
मिश्रण ट्रेमध्ये थापल्यानंतर वरून चांदीचा वर्खही लावू शकतो. त्यामुळे कलाकंद अधिक आकर्षक दिसेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या