जर तुम्हाला चटपटित काहीतरी खायचे असेल, तर कटोरी चाट पेक्षा स्वादिष्ट काय असू शकत. चला तर मग शिकुया कोटोरी चाट बनविण्याची विधी -
कोटोरी चाट रेसिपी |
साहित्य :
कोटोरीसाठीः
- 2 कप मैदा
- 1 चमचा मीठ
- 2 चमचे तेल(गरम)
- पाणी
- 1 चमचा ओवा (पर्यायी)
- तळण्याचे तेल
चाटसाठी:
- 1 वाटी उकडलेले चणा
- 1 बटाटा उकडलेला
- 1/4 कप हिरवी चटणी
- 1 कप मोड आलेले मूग
- 1/4 कप चिंचेची चटणी
- 1 कप दही
- 1 चमचा लाल तिखट
- 1 चमचा जिरेपूड
- 1 चमचा चाट मसाला
- 1 कांदा, बारीक चिरलेला
- 1 टमाट, बारीक चिरलेला
- ½ कप शेव
- कोथिंबीर
- मीठ
पद्धत :
- सर्वप्रथम मैदा, मीठ व थोडे तेल घेवून एका भांड्यात चांगले मिसळून थोड पाणी घाला व त्याची कडक कणिक बनवा त्यात थोडा बेकिंग सोडा घाला व त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. आता पुऱ्या एका वाटीच्या बाहेरच्या बाजूने गुंडाळून घ्या.
- कढईत तेल घेवून त्यात हळूहळू कटोरी टाका व कटोरी पूरीपासून वेगळे होईपर्यंत थोड़े थोड़े तेल शिंपडत रहा. तपकिरी रंगाचे होई पर्यंत तळा. कटोरी तळल्या नंतर एका प्लेट मधे काढून घ्या.
- त्यात 1 चमचा उकडलेला चणा, 1 चमचा उकडलेला बटाटा, 2 चमचे मोड आलेले मूग, 1 चमचा हिरवी चटणी, 1 चमचा चिंचेची चटणी, 1 चमचा दही, 1 चमचा कांदा आणि टोमॅटो घाला.चिमटभर तिखट, जिरेपूड आणि मीठ टाका. 2 चमचा शेव आणि कोथिंबीर घाला.
- शेवटी चाट मसाला शिंपडा आणि गरमागरम खायला द्या..
0 टिप्पण्या