आंब्याचा शीरा |
साहित्य :
- रवा - 1/2 कप
- आंब्याचा रस - 1/2 कप
- साखर - 1 कप
- पाणी - 1 आणि 1/2 कप
- मीठ - एक चिमूटभर
- वेलचीपूड - 1 चमचा
- तूप - 1/4 कप
- काजू / बदाम - 5-6
पद्धत :
- आंब्याचा घट्ट रस बनवून घ्या.
- कढईत २ चमचा तूप घाला आणि कापलेले काजू / बदाम सोनेरी होईपर्यंत तळा आणि बाजूला ठेवा. त्याच कढईत रवा आणि 1/4 कप तूप घ्या.
- एक मिनिट किंवा मध्यम आचेत रव्याचा रंग न बदलता सुगंधित होईपर्यंत भाजून घ्या. बाजूला ठेवा. 1/2 कप पाण्यात मीठ घालून उकळुन घ्या आणि त्यात आंब्याचा रस घाला. चांगले मिसळा आणि त्यात भाजलेला रवा घाला आणि गुठळ्या न होवू देता ढवळावे. ढवळून ३-४ मिनीटे वाफ काढावी.
- रवा चांगला शिजला कि त्यात साखर घालावी, वेलचीपुड घालावी, व्यवस्थित ढवळावे. मध्यम आचेवर वाफ काढावी. नंतर तळलेले काजू / बदामचे काप घालावे आणि चांगले मिसळा.
टीप:
- साखरेचे आणि तुपाचे प्रमाण आपल्या गरजेनुसार कमी किंवा जास्त घ्यावे.
- गोड असलेला आंबा निवडा. मी हापुस आंबा वापरला आहे.
- साखर घालण्यापूर्वी रवा उत्तम प्रकारे मऊ झाला आहे याची खात्री करुन घ्या. अन्यथा ते चबाळ होईल.
0 टिप्पण्या