साहित्य:
- 3 कप इडलीचे आंबवलेले पीठ [इडली पिठाच्या रेसिपीचा संदर्भ घ्या]
- 1/2 टीस्पून आले किसलेले
- 1 कांदा बारीक चिरलेला
- 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- आपल्या आवडीच्या 1/2 कप भाज्या [गाजर / बीटरूट / उकडलेले मटार इ.]
- 1/2 कप कोथिंबीर बारीक चिरलेली
- चवीनुसार मीठ.
कृती:
- वरील सर्व साहित्य चांगले मिसळा.
- अप्पे पात्र गॅसवर गरम करण्यास ठेवावे. प्रत्येक कप्प्यात दोनदोन थेंब तेल घालावे. इडलीचे पीठ चमच्याने घालून कप्पे भरावेत. झाकण ठेवून मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटे वाफ काढावी.
- झाकण काढून अप्प्यांचे पृष्ठभाग तेलाने ब्रश करावे. अप्प्यांची बाजू पलटवावी. थोडेसे प्रेस करावे. परत झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे अप्पे वाफवून घ्यावेत.
- गरम अप्पे चटणीबरोबर किंवा सांबरबरोबर खायला दया.
0 टिप्पण्या