बटाटा चीज़ कॉर्न पराठा | potato cheese corn paratha in marathi

बटाटा चीज़ कॉर्न पराठा
बटाटा चीज़ कॉर्न पराठा
साहित्य : 

  • 1 कप गहू पीठ
  • 3 उकडलेले मोठे बटाटे
  • 1/2 कप मका दाणे(उकडलेले )
  • 1/2 कप चीज किसलेला 
  • 4-5 हिरव्या मिरच्या  किंवा 1 चमचा लाल तिखट 
  • 1 चमचा चिली फ्लेक्स
  • 1 चमचा ओरीगानो
  • 1 चमचा चाट मसाला(पर्यायी)
  • 1 टेबलस्पून लिंबाचा रस 
  • कोथिंबीर
  • मीठ
  • बटर
  • तेल

कृती :

  1. गव्हाचे पिठ चवीपुरते मिठ घालून मळुन घ्यावे. 
  2. एका भांड्यात उकडलेले बटाटे किसून घ्या. मिक्सर मध्ये कोथिंबीर, मिरच्या जाडसर वाटून घ्यावे. ते बटाटा मध्ये घालून त्यात मका, चीज, मीठ, चाट मसाला, चिली फ्लेक्स, ओरीगानो सर्व घालून नीट एकत्र करून घ्या. लिंबाचा रस घाला.
  3. 4 इंच गोल पोळी लाटून त्यात वरील मिश्रणाचा एक गोळा मध्यभागी ठेवावा आणि कणकेची बाकी टोकं मध्यभागी आणून बटाट्याचे मिश्रण पूर्ण कव्हर करावे (पुरणपोळीला जसे करतो तसे).
  4. पोळपाटावर थोडे गव्हाचे पिठ लावावे. आणि हलक्या हाताने पराठा लाटावा. तवा गरम करावा आणि मगच पराठा त्यावर टाकावा. बटर किंवा तेलावर हा पराठा दोन्ही बाजूंनी निट भाजावे.
  5. दही, चटनी, सॉस बरोबर गरम सर्व्ह करा.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या