साहित्य:
- 1 कप उकडलेले बटाटे
- ताजे ब्रेड
- कोथिंबीर (बारीक चिरूलेली)
- 2-3 हिरव्या मिरच्या
- चवीनुसार मीठ
- चीज क्युब्स
- 1/2 चमचे लाल तिखट
- 1/4 चमचे गरम मसाला
- 1/4 चमचे आमचूर पावडर (पर्यायी)
- 1 कप पाणी
- तळण्यासाठी तेल
कृती :
बटाटे कसे उकलावे :
- प्रेशर कुकरमध्ये बटाटे आणि 1 लिटर पाणी घाला. सर्व बटाटे पूर्णपणे पाण्यात बुडलेले असल्याची खात्री करा. आवश्यक असल्यास, अधिक पाणी घाला. तसेच, सर्व बटाटे ठेवण्यासाठी कुकर पुरेसा मोठा असावा.
- बटाट्यांसह एकूण पाण्याची पातळी कुकर खोलीच्या 75% पेक्षा जास्त नसावी.
- दोन शिट्ट्यांनंतर स्टोव्ह बंद करा. कुकरचे वाफ जाईपर्यंत त्याचे झाकण उघडू नका.
बटाटा ब्रेड रोल बनवण्याची पद्धत :
- एकाभांड्यामध्ये उकडलेले बटाटे किसुन घ्या.
- आता त्यात मीठ, तिखट, आमचूर पूड, गरम मसाला, चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घाला .
- चाकूच्या सहाय्याने ब्रेडची काठ कापून घ्या.
- एक प्लेटमध्ये थोडेसे पाणी घ्या आणि ब्रेड पाण्यात बुडवा, नंतर भिजवलेले ब्रेड हातावर घेऊन हलके दाबून घ्या, ब्रेडचे अतिरिक्त पाणी काढून टाका (ब्रेडचे तुकडे तुटू नये याची काळजी घ्या).
- आता त्यावर 1 चमचा बटाट्याचे सारण आणि एक चीज क्यूब घाला.
- ब्रेडला सर्व बाजूंनी दाबताना रोल तयार करा(सारण बाहेर पडू नये असे रोल बनवा).
- एक खोल कढाईमध्ये तेल घ्या. 10 मिनिटे तेल गरम करावे. जेव्हा ते गरम होईल तेव्हा स्टोव्ह मध्यम ठेवा
- तेलेमध्ये रोल टाका. ते प्रत्येक बाजूला समान सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. यास सुमारे 6-7 मिनिटे लागतील. तळताना, सतत रोल पलटत रहा जेणेकरून ते सर्व बाजूंनी तळतील
- जेव्हा सर्व बाजूने सोनेरी रंग येईल तेव्हा तेलाबाहेर काढा.
- टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीसोबत बटाटा ब्रेड रोल सर्व्ह करा.
टिप:
- आपण बटाट्याऐवजी दुसरे सारण वापरूनही रोल बनवू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मांसाहार आवडत असेल तर चिकनचे बनवू शकता तसेच पनीर आणि हिरवे वाटाणे आवडल्यास पनीर भुर्जी घालू शकता.
- बटाटे आणि ब्रेड रोल आणि सर्व्ह करतानाच तळावे. असे केल्याने ब्रेड रोलचा कुरकुरीतपणा टिकून राहिल आणि चव चांगली होईल.
0 टिप्पण्या