मिरची आणि लिंबाचे लोणचे | recipenmore

साहित्य:
  • 1/2 किलो हिरव्या मिरच्या  
  • 2-3 लिंबू
  • 2  चमचे मीठ
  • 1/2 कप मोहरीचे पीठ (लाल मोहरी)
  • 1/2 चमचा हिंग
  • चमचा हळद
  • 2 चमचे मोहरी तेल
कृती :
  1. मिरच्या अर्ध्या किंवा 2 इंचात कापून घ्या.
  2. लिंबाचे मोठे काप कापून घ्या.
  3. एका भांड्यात मीठ, हिंग, मोहरीचे पीठ, हळद घालुन मिसळा.
  4. आता कढईत तेल गरम करा आणि तेल गरम झाल्यावर वरील मिक्स घाला. चांगले तेलात हलवून घ्या आणि गॅस बंद करा.
  5. एकदा मसाला एकत्र झाला कि थंड होऊ द्या. नंतर मिरच्या आणि लिंबाचे तुकडे घाला. चांगले मिसळा.
  6. स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या भांड्यात हे लोणचे घाला.
  7. 5 ते 6  दिवस ठेऊन दया म्हणजे लोणचे चांगले मुरले जाईल. 
टीपः
  • 3 -4  दिवस दररोज लोणच्याचे भांडे हलवत रहा. 
  • लोणच्याचे भांडे नेहमी बंद असल्याची याची खात्री करा. 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या