गव्हाची खीरीसाठी गहू कांडून दलिया सारखा करतात. त्यासाठी गहू पाणी लावून थोडे ओलसर करायचे म्हणजे कोंडा पट्कन सुटून येतो. असे पाणी लावून एक अर्धा तास ते गहू ठेवतात. मग उखळात कांडतात. असे केल्याने कोंडा निघून येतो. तो पाखडून काढतात. कांडताना गव्हाचे तुकडे होतात, साधारण दलियाहुन थोडे मोठे असे. मग ते गहू हुग्गी (कानडी शब्द) म्हणजेच खीर करायला वापरतात.
साहित्य :
- २ चमचे बडीशेप, वेलची, जायफळ पूड
कृती :
- गूळ खिसुन घ्यावे.
- एका भांड्यात तूप आणि गव्हाची भरड घेऊन भाजुन घ्यावी. भरड भाजून झाली की त्याचा रंग पांढरा होतो.
- २ ग्लास पाणी गरम करायला ठेवणे. गरम केलेले पाणी भाजलेल्या भरड मधे ओतावे. पाणी ओतल्यावर भांड झाकून ठेवणे मेडीयम गॅस वर भरड शिजवणे.
- तुम्ही भरड कुकर मध्ये ही शिजवु शकता . भाजलेली भरड आणि २ ग्लास पाणी घालून कुकरच्या २ शिट्ट्या होऊ द्या.
- भरड शिजल्यावर त्यात वेलची, जायफळ, बडीशेपची पूड व गूळ टाकून हलवणे. शेवटी काजू व ओला नारळाचे काप टाकावे.
- गरम गरम गव्हाची खीर तयार!
Read more Recipes : आंब्याचा शीरा। मँगो मस्तानी। फ्रूट कस्टर्ड । बनाना मिल्कशेक
0 टिप्पण्या