अगदी सोपी आणि त्वरीत होणारे पोहे वड्याची पाककृती -
पोहे वडे बनवण्याची सोपी पद्धत | Pohe wade recipe |
साहित्य :
- २ कप पोहे
- १ कप दही
- १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला )
- १ चमचा लाल तिखट
- १/२ चमचा गरम मसाला
- चवीपुरते मीठ
- कोथिंबीर ( बारीक चिरलेली )
- तेल तळण्यासाठी
- टोमॅटो सॉस
कृती :
- पोहे ५-१० मिनिटे भिजवून घ्यावे .
- पोहे भिजले की त्यात दही , बारीक चिरलेला कांदा , लाल तिखट , गरम मसाला , कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ टाकून चांगले मिसळून घ्यावे. पाणी घालु नये.
- आता त्याचे चपटे गोळे करून घ्या.
- एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यास गॅस मेडीयम आचेवर ठेवा आणि तेलात वडे टाकून हळुहळु वडे ताळुन घ्या . वडे तळायला १०-१५ मिनिटे लागतील. वडे सोनेरी रंगाचे झाल्यास वडे काढून घ्या.
- टोमॅटो सॉस सोबत खायला द्या गरम गरम पोहे वडे.
Read more Recipes : वडापाव | कोल्हापुरी कटवडा । तिखट पुऱ्या
0 टिप्पण्या