उत्तपा (उत्तपम) | Uttapa (Uttapam) recipe in marathi

उत्तपा (उत्तपम) | Uttapa (Uttapam) recipe in marathi
उत्तपा (उत्तपम) | Uttapa (Uttapam) recipe in marathi 

साहित्य:
  • 1/2 कप उडीद डाळ
  • दिड कप तांदूळ
  • 1 कांदा
  • 1 टोमॅटो
  • ब्लॅक पेपर (पर्यायी)
  • चाट मसाला (पर्यायी)
  • कोथिंबीर
  • चवीपुरते मीठ
  • तेल

कृती:
  • तांदूळ आणि उडीद डाळ पाण्यात साधारण 7-8 तास भिजत घालावे. नंतर मिक्सरमध्ये थोडे बारीक वाटून घ्यावे. मिश्रण एकदम पातळ किंवा घट्टं नसावे. मध्यमसर वाटावे, त्यानुसार वाटताना पाणी घालावे. मिक्सरमध्ये डाळ व तांदूळ वाटताना 1 चमचा मिठ घालावे.


  • वाटलेले मिश्रण आंबवण्यासाठी उबदार ठिकाणी किमान 10-12 तास झाकून ठेवावे.
  • कांदा, टमाटे, कोथिंबीर, मिरची  या भाज्या बारीक चिरून घ्या. तुम्ही गाजर, शिमला मिरची, कोबी बारीक चिरून त्यात घालु शकता. त्यानंतर त्यात थोडे ब्लॅक पेपर ,चाट मसाला  आणि मीठ घालावे. 
  • नॉनस्टीक तवा गरम करावा. 1/2 चमचा तेल घालावे. आंबवलेल्या पिठापैकी 1 पळीभर पिठ तव्यावर घालून थोडे जाडसर पसरवावे. त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची टाकून हाताने किंवा चमचाने भाज्या पीठावर दाबून घ्यावे. 
  • मध्यम आचेवर तव्यावर झाकण ठेवून थोडी वाफ काढावी. एक बाजू शिजली कि सावकाशपणे कालथ्याने बाजू पलटावी. दुसरी बाजू शिजू द्यावी. 
  • गरम गरम उत्तपा, सांबार आणि चटणीबरोबर सर्व्ह करावे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या