खुसखुशित समोसा पाककृती | samosa recipe in marathi

 samosa recipe in marathi
खुसखुशित समोसा


साहित्य :    
सारण बनवण्यासाठी

  • 4 उकळलेले बटाटे
  • पाव किलो हिरवे वाटाणे
  • 2 हिरव्या मिरच्या
  • कोथंबीर 
  • आलं
  • 10 पाकळ्या लसूण
  • 1 चमचा धणे पावडर
  • 1 चमचा जिरा पावडर 
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1 चमचा बडीशेप
  • 1 /2 चमचा साखर 

पुरी बनवण्यासाठी

  • 400 ग्रॅम मैदा
  • 1 चमचा  ओवा
  • 1 चमचा जिरे
  • 2 चमचा साजूक तूप

कृती :

  1. समोसा पुरी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मैदा, ओवा, जिरं, चवीनुसार मीठ आणि गरम तूप किंवा तेल  घ्या. मग थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्या. पीठ घट्ट बनवुन घ्या  म्हणजे समोसे खुसखुशित होतील. या पिठाच्या गोळ्यावर ओला कपडा ठेवुन 10-15 मिनिटे भिजू दया.
  2. सारण बनवण्यासाठी आधी आलं लसूण, मिरची, कोथिंबीर हे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या.
  3. उकडलेल्या बटाटयाचे लहान लहान काप करुन घ्या किंवा कुसकरुन घ्या.
  4. कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात वटाणे घालुन दोन-तीन मिनिट परतून घ्यावेत. आता मिक्सरमधुन काढलेली लसूण, मिरची, कोथिंबीर ची भरड टाका आणि पुन्हा चांगले परतून घ्या. यामध्ये बडीशेप, धने पूड, जिरेपूड, लाल तिखट, साखर आणि मीठ  घालुन पुन्हा चांगले परतून घ्या. आता यात बटाटयाचे काप घाला आणि सर्व मिश्रण एकजीव करा.‌ 
  5. लाटण्याने मैद्याच्या पातळ लांबट पुऱ्या लाटून घ्या. सुरीने पुरी मधोमध कापून, 2 समान अर्धे भाग करावे. जिथे कापले आहे  त्या सरळ रेषेवर पाणी लावून घ्या आणि त्या 2 कडा एकमेकांवर चिकटवून कोन बनवून घ्या. या कोनमध्ये 1 ते 1.5 चमचा सारण भरून हलक्या हाताने आत ढकला. आता जी पुरीचि मोकळी वक्राकार बाजू आहे तिलादेखील पाणी लावून घ्या आणि ती बाजू समोरच्या कोनाच्या बाजूवर चिकटवावी. अशाप्रकारे सर्व समोसे तयार करावेत.
  6. समोसे तळण्याआधी ते 10 मिनिटे न झाकता हवेवर कोरडे होऊ द्यावेत जेणेकरून तळताना त्यावर हवेचे बुडबुडे येणार नाहीत
  7. समोसे तळण्यासाठी कढईत तेल गरम करावे. समोसे तेलात बुडतील इतपत तेल असावे. समोसे मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावे.

गरम गरम समोसे पुदिन्याच्या टणी किंवा चिंचेच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो केचप सोबत स्वादिष्ट लागतात. 
 samosa recipe in marathi


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या