व्हाइट सॉस पास्ता पाककृती मराठीमधे
white sauce pasta recipe in marathi |
साहित्य :
- 2 कप पास्ता
- 1 कप मकाचे दाणे
- 1 चमचा तेल
- 1 चमचा ब्लॅक पेपर
- 2 चमचे बटर
- 1 कप मैदा
- 500 मिलिलिटर दूध
- चीज
- मीठ
- रेड चिली फ्लेक्स
- ओरेगानो
- पाणी
कृती :
- सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात 5 ते 6 कप पाणी उकळवावे. त्यात मीठ आणि अर्धा चमचा तेल घालून ढवळावे. पाणी उकळायला लागले कि त्यात 1 कप पास्ता घालून 10 ते 15 मिनीटे शिजवून घ्यावे. शिजवताना झाकण ठेवू नये तसेच मोठ्या आचेवर शिजवावे. पाणी उतू जाण्याची शक्यता असते म्हणून खोलगट आणि मोठे भांडे घ्यावे. तळाला चिकटू नये म्हणून मधेमधे तळापासून ढवळावे. (पास्ता शिजताना जर पाणी कमी झाले असेल तर गरजेपुरते पाणी वाढवावे.)
- पास्ता शिजला कि एका चाळणीत काढून घ्यावे आणि त्यावर थंड पाणी घालावे. सर्व पाणी निघून जाऊ द्यावे.
- आता एका पॅनमध्ये 2 चमचे बटर गरम करावे. नंतर त्यात मैदा भाजून घ्यावा. त्यात मका घालुन 1 ते 2 मिनिटे परतावे. चिमूटभर ओरेगानो, ब्लॅक पेपर, चिली फ्लेक्स आणि मिठ घालावे.
- त्यात दूध घालुन त्याला उकळी येऊ द्यावी व सॉस घट्ट होऊ द्यावे.
- साॅस घट्ट झाल्यानंतर त्यात शिजलेला पास्ता घालावा. गॅस मंद ठेवून 1 ते 2 मिनीटे चांगले मिसळावे आणि 2 मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे.
- व्हाइट सॉस पास्ता सर्व्ह करताना किसलेले चीज, ओरेगानो आणि आवडीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स टाकावे.
Read more Recipes : चीज़ गार्लिक ब्रेड | बटाटा चीज़ कॉर्न पराठा | व्हेज मोमोज | समोसा
0 टिप्पण्या