रेड सॉस पास्ता | red sauce pasta recipe in marathi |
साहित्य :
- 2 वाटी पास्ता
- 3 टोमॅटो
- 1 वाटी मकाचे दाणे
- 1 चमचा अद्रक, लसूण पेस्ट
- तेल
- आवडीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स
- 1 चमचा ऑरेगॉनो
- मीठ
- किसलेला चीज
कृती:
- एका मोठ्या खोल पातेल्यात 5 ते 6 कप पाणी उकळवावे. त्यात मीठ आणी 1 चमचा तेल घालून ढवळावे. पाणी उकळायला लागले कि त्यात पास्ता घालून 10 ते 15 मिनीटे शिजवून घ्यावे. शिजवताना झाकण ठेवू नये तसेच मोठ्या आचेवर शिजवावा. पाणी उतू जाण्याची शक्यता असते म्हणून एकदम खोलगट आणि मोठे पातेले घ्या. तळाला चिकटू नये म्हणून मधेमधे तळापासून ढवळावे.
- पास्ता शिजला कि एका चाळणीत काढून घ्यावे आणि त्यावर थंड पाणी घालावे. सर्व पाणी निघून जाऊ द्यावे.
- एका पातेल्यामध्ये टोमॅटो आणि पाणी घेऊन उकळवावे. टोमॅटो मऊ झाल्यास गॅस बंद करावा आणि टोमॅटो ची साल काढावी. थंड झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यावी.
- आता पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करावे, त्यामध्ये अद्रक, लसणाची पेस्ट, मका घालून 1 ते 2 मिनीट परतावे. नंतर त्यात टोमॅटो प्युरी, मीठ, चिमूटभर ओरेगानो आणि आवडीनुसार रेड चिली फ्लेक्स टाकून गॅस मंद ठेवून 1 ते 2 मिनीट निट मिक्स करावे. नंतर पास्ता टाकून पाच मिनिटं शिजू द्यावे.
- पास्ता तयार झाल्यावर त्यावर किसलेले चीज टाकून सर्व्ह करावा.
Read more Recipes : व्हाइट सॉस पास्ता | चीज़ गार्लिक ब्रेड | व्हेज मोमोज | बटाटा चीज़ कॉर्न पराठा
0 टिप्पण्या