झुणका हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. हा डाळीचे पीठ खरपूस व घट्ट शिजवून बनवतात. पातळ बनवल्यास त्याला पिठले म्हणतात. पिठले किंवा झुणक्यात कांदा व मिरची हमखास असते. झुणका बहुधा भाकरीसोबत तर पिठले भाताबरोबर खातात. खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी प्रसिद्ध आहे.
साहित्य :
झुणका बनवण्यासाठी :
झुणका बनवण्यासाठी :
- १ वाटी बेसन
- १ चमचा मोहरी
- १/२ चमचा जिरे
- १ चमचा लसूण आणि आले पेस्ट
- १ चमचा धनिया पावडर
- १ चमचा हळद
- २-३ हिरव्या मिरच्या किंवा १ चमचा लाल तिखट
- १ कांदा चिरलेला
- १ टोमॅटो चिरलेला
- ४-५ कढीपत्ताची पाने
- चवीनुसार मीठ
- 1 चमचा तेल
- कोथिंबीर बारीक चिरलेली
कृती :
झुणका बनवण्याच्या २ पद्धती आहेत -
पद्धत १ :
पद्धत २ :
- बेसन पीठात एक कप पाणी घालून गुळगुळीत पेस्ट बनवा.
- आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे टाका . त्यात लसूण पेस्ट आणि आले पेस्ट घाला.
- चिरलेला कांदा घाला. कांदा हलका गुलाबी होईस्तोवर तळा. कढीपत्ता घाला.
- आता हळद आणि तिखट किंवा चिरलेली मिरची घाला.
- टोमॅटो घाला आणि २ - ३ मिनिटे शिजवा.
- आता त्यात बेसन पीठ मिश्रण, मीठ घालून एक कप (किंवा जास्त) पाणी घालून चांगले मिक्स करा.
- सतत चमचा फिरवत रहा. अणि उकळी येऊ दया.
- कोथिंबीर, कांदा आणि भाकरी बरोबर सर्व्ह करा.
- एक कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे घाला. त्यात लसूण पेस्ट आणि आले पेस्ट घाला.
- चिरलेला कांदा घाला. कांदा हलका गुलाबी होईस्तोवर तळा.
- कढीपत्ता घाला.
- आता हळद आणि चिरलेली मिरची किंवा तिखट घाला.
- टोमॅटो घाला आणि २-३ मिनिटे शिजवा.
- तीन कप पाणी आणि मीठ घालून उकळी आणा.
- आता बेसन पीठ घाला आणि चांगले ढवळावे (सगळ्या गाठी नाहीश्या होईपर्यंत ढवळावे). आणि ४-५ मिनिटे शिजवा.
- कोथिंबीर, कांदा आणि भाकरी बरोबर सर्व्ह करा.
0 टिप्पण्या