मोदकची भाजी पाककृती -
मोदक भाजी | Modak bhaji recipe in marathi |
साहित्य :
- १ कप बेसन
- १ कप खिसलेले खोबरे
- १/२ कप शेंगदाण्याचे कूट
- १ चमचा लसूण पेस्ट
- १/२ चमचा लाल तिखट
- १/२ चमचा काळा मसाला
- १ चमचा हळद
- मोहरी
- जिरे
- १/२ चमचा धने पूड
- १/२ चमचा जिरे पूड
- कडीपत्ता
- चवीपुरते मीठ
- तेल
- कोथिंबीर बारीक चिरलेली
कृती :
- एका भांड्यात बेसन, लाल तिखट, १/२ चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. पीठामध्ये जास्त पाणी घालू नये. पीठ घट्टच बनवावे.
- आता एका भांड्यात शेंगदाण्याचे कूट, १/२ कप खिसलेले खोबरे, १/२ चमचा लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, आवडीनुसार काळा मसाला आणि कोथिंबीर घालून मिसळून घ्यावे नंतर त्यात १-२ चमचे पाणी घालून सर्व साहित्य मिसळावे.
- बेसन पिठाचे हाताने पुऱ्या बनवून त्यात वरील सारण घालून मोदकचा आकार द्यावा आणि उकडून घ्यावे. मोदक उकडल्यास त्याचा रंग बदलतो.
- मोदक उकडल्यास एका कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, १/२ चमचा लसूण पेस्ट, कडीपत्ता, धने पूड, जिरे पूड, काळा मसाला आणि १/२ कप खिसलेले खोबरे घालून फोडणी द्यावी. नंतर त्यात २ कप गरम पाणी घालावे. भाजी जर खूप पातळ वाटत असेल तर बेसन भाजून घालावे.
- आता त्यात चवीनुसार मीठ आणि उकडलेले मोदक घालून भाजी उकळायला ठेवावे. एका उकळी नंतर गॅस बंद करावे आणि वरून कोथिंबीर टाकावी. भाजी खाताना मोदक फोडून मिसळावे.
- गरम गरम मोदक भाजी चपाती किंवा भाकरी सोबत खायला द्यावे.
0 टिप्पण्या