सोपे आणि झटापटीत होणारे नारळाचे लाडू पाककृती -
नारळाचे लाडू | Naralache Ladoo recipe in marathi |
साहित्य :
- नारळ
- ३/४ कप किसलेले गूळ
- १/२ चमचा जायफळ पूड
- १/२ कप पाणी
- २ चमचे बदामाचे काप ( पर्यायी )
कृती :
- नारळाचा वरचा ब्राउन भाग काढावा. नंतर नारळाचे लहान तुकडे करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे किंवा किसून घ्यावे.
- एका भांड्यात १ कप बारीक वाटलेले नारळ ३-४ मिनिटे भाजून घ्यावे.
- एका कढईत किसलेले गूळ आणि १/२ कप पाणी घालावे आणि उकळायला ठेवावे. जेंव्हा गुळाचा एक तारी पाक होईल त्यात जायफळ पूड टाकावे आणि सतत ढवळत राहावे म्हणजे भांड्याच्या तळाला चिकटू नये. ( तुम्ही गूळ ऐवजी साखर वापरू शकता )
- आता गुळाच्या मिश्रणात भाजलेले नारळ घालून मिसळावे आणि नारळ आणि गूळ एकजीव होईपर्यंत माध्यम आचेवर शिजवावे. जास्त शिजवू नये.
- बदामाचे काप घालावे. गॅस बंद करावे आणि सारण थंड होऊ द्यावे.
- सारण थंड झाल्यास तुपाचा हात घेऊन लाडू वळावेत. हे लाडू ४-५ दिवस टिकतात.
0 टिप्पण्या