पालक पनीर रेसिपी मराठीमध्ये -
पालक पनीर | palak paneer recipe in marathi |
साहित्य :
- १ किंवा १/२ जुडी पालक
- २०० ग्रॅम पनीर
- १ चमचा लसूण बारीक चिरलेले
- १/२ चमचा आद्रक बारीक चिरलेले
- ३-४ हिरव्या मिरच्या
- १/२ कांदा बारीक चिरलेला
- १/२ टोमॅटो बारीक चिरलेला (पर्यायी)
- १ चमचा जिरे
- १/२ चमचा गरम मसाला
- १ चमचा लाल तिखट
- १ चमचा बटर किंवा लोणी
- २ चमचे तेल
- चवीनुसार मीठ
- २ चमचे मलाई / क्रीम
- १/२ कप पाणी
कृती :
- पालक धुवून मिक्सर मध्ये बारीक वाटुन घ्यावे. पाणी घालू नये.
- एका कढईत पनीर, बटर घालून पनीर सगळ्या बाजूने भाजून घ्यावे. ( जर तुम्हाला पनीर मऊ हवे असेल तर पनीर २-३ मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर सगळे पाणी वितळू द्यावे आणि बटर टाकून भाजावे.)
- आता एका कढईत तेल गरम करून त्यात बटर घालावे. नंतर त्यात जिरे, लसूण, मिरच्या आणि आद्रक टाकावे. लसूण, मिरच्या आणि आद्रक चांगले परतून घ्यावे.
- आता त्यात कांदा टाकून गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे.
- नंतर त्यात वाटलेले पालकचे मिश्रण आणि १/२ कप पाणी टाकावे.
- मिश्रण उकळाल्यास त्यात चवीनुसार मीठ, तिखट, गरम मसाला आणि पनीर घालावे.
- ५-६ मिनिटे उकळल्यास गॅस बंद करावे आणि वरून मलाई / क्रीम टाकावे आणि एकत्र मिसळावे.
- तयार पनीर चपाती किंवा नान सोबत सर्व्ह करावे.
पालक पनीर | palak paneer recipe in marathi |
0 टिप्पण्या