आता घरीच बनवा बाजारात मिळणारे पनीर सोप्या पद्धतीने -
घरगुती पनीर रेसिपी | Homemade Paneer recipe in marathi |
साहित्य :
- १ लिटर दूध
- २ लिंबं
- १ कप पाणी
कृती :
- एका मोठ्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवा.
- लिंबाचा रस काढून १ कप पाण्यात मिसळा.
- दूध उकळल्यास चमच्याने २-३ मिनिटे ढवळत राहा आणि गॅस बंद करा.
- आता लिंबाचे मिश्रण थोडे थोडे उकळलेल्या दुधात ओतत राहा आणि दूध चमच्याने एकाच दिशेने हलवत राहा. मग दूध फाटते (नासते).
- नंतर एका चाळणीवर ओला सुती कपडा ठेवा आणि त्यावर दूध ओता. वरून थंड पाणी टाका.
- सगळे पाणी पिळून काढा. त्याच्यावर जड वस्तू ठेवा जेणेकरून सर्व पाणी निथळून जाईल.
- ३-४ तासानंतर त्याच्या वड्या पाडा. पनीर फ्रिज मध्ये ठेऊन तुम्हाला हवे तेंव्हा वापरू शकता.
टीप :
लिंबाऐवजी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता.
0 टिप्पण्या