पारंपारीक रवा लाडू पाककृती -
रवा लाडू | rava ladoo in marathi |
साहित्य :
- २ कप रवा
- १ कप पिठी साखर
- २ चमचा तूप
- दूध
- २ चमचे काजू बदामाचे काप
- १ चमचा विलायची पूड
कृती :
- एका कढईत रवा आणि १ चमचा तूप घेऊन लालसर होईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्यावे.
- रवा थंड झाल्यास त्यात थोडे थोडे दूध घालावे. लाडू वळता येईल असे मिश्रण करावे.
- नंतर त्यात १ चमचा तूप, काजू बदामाचे काप, विलायची पूड आणि हवे असेल तर खायचा रंग टाकावे.
- आता त्यात पिठी साखर टाकून सर्व साहित्य चांगले मिसळून घ्यावे.
- आणि लाडू वळून घ्यावे किंवा मोदक पात्रात घालून मोदकचा आकार द्यावा.
- जर लाडू वळता येत नसतील तर दूध टाकावे.
0 टिप्पण्या