Takachi Kadhi recipe in Marathi | ताकाची कढी

Takachi Kadhi recipe in Marathi | ताकाची कढी
Takachi Kadhi recipe in Marathi | ताकाची कढी

ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात. त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असये. ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते. ताक शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर करतात. नियमितपणे त्याचे सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो. शरीरातील रक्तभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते. याशिवाय हृदयाचा धमन्या कठीण बनणे, हृदयाचा झटका, कर्करोग यासारख्या घातक जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.
पाचक चवदार ताक नुसतेच प्यायले तरी चालते. पण कढ तर जास्तच चवदार लागते.

साहित्य :
  • 500 मिली ताक
  • 2 चमचा बेसन
  • 1 चमचा मोहरी
  • 1/2 चमचा जिरे
  • चमचा लसूण आणि आले पेस्ट
  • 4-5 कडीपत्ताची पाने 
  • चमचा हळद
  • 2-3 हिरव्या मिरची (बारीक चिरलेल्या) 
  • हिंग
  • चवीनुसार मीठ
  • तेल
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
कृती :
  1. बेसन पीठ घ्या आणि थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवा.
  2. आता ताकात हळद, मीठ, लसूण पेस्ट, आल्याची पेस्ट आणि बेसन पेस्ट घाला आणि चांगले ढवळून घ्या.
  3. एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे घाला. नंतर त्यात मिरची, कढीपत्ता आणि हिंग घाला. 
  4. आता त्यात ताक घालून उकळी आणा.
  5. पुढील २- ३ मिनिटे शिजू द्या.
  6. कोथिंबीर टाकुन  गरम सर्व्ह करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या