spinach curry recipe | पालकची भाजी

spinach curry/पालक भाजी
 spinach curry । पालक भाजी

साहित्य :
  • १ जुडी ताजी पालक 
  • १/२ कप शेंगदाणे 
  • १/२ कप चणा डाळ
  • १ चमचा मोहरी
  • १/२ चमचा जिरे
  • १ चमचा लसूण आणि आले पेस्ट
  • १ चमचा धनिया पावडर 
  • १ चमचा हळद
  • १ चमचा लाल तिखट
  • १-२ मिरची
  • १ टोमॅटो
  • १ चमचा बेसन
  • चवीनुसार मीठ 
  • १ चमचा तेल
  • कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी

कृती :
  1. पालक धुवून चिरून घ्यावी. 
  2. प्रेशर कुकरमध्ये चिरलेली पालक, शेंगदाणे आणि चणा डाळ आणि तिखट घालून १ शिटी होऊ दया.
  3. आता शिजवलेल्या पालकात बेसन, मीठ घालून चांगले मिक्स करन घ्या.
  4. एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे घाला. नंतर लसूण पेस्ट घालावी, लसूण तपकिरी होईपर्यंत तळा.
  5. आले पेस्ट, हळद, धनिया पावडर आणि तिखट घाला.
  6. टोमॅटो घाला आणि 3-4 मिनिटे शिजवा.
  7. आता पालक मिश्रण घालुन एक कप (किंवा जास्त) पाणी घाला. आणि उकळी येई पर्यंत शिजवून घ्या. 
  8. भात किंवा चपाती सोबत गरम सर्व्ह करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या