chocolate Sandwich in Marathi |
साहित्य :
- 150 ग्रॅम डार्क चॉकलेट(किसलेले)
- 2 चमचे बटर/लोणी
- 4 ब्रेडचे तुकडे
- 8-10 बदाम (बारीक चिरलेले)
- चीज (किसलेले)
- चॉकलेट सॉस(पर्यायी )
कृती :
- चॉकलेटचे मध्यम तुकडे करून काचेच्या भांड्यामध्ये ठेवून ३० सेकंद मायक्रोवेव्ह मधे वितळून घ्यावे. मायक्रोवेव्ह नसेल तर उकळत्या पाण्यात काचेचे भांडे ठेऊन चॉकलेट वितळून घ्यावे.
- कढईत बदाम भाजून घ्या आणि त्याचे काप करुन घ्या.
- एका प्लेटमध्ये ब्रेडचे तुकडे घ्या आणि ब्रेड स्लाईसच्या एका बाजूला बटर लावावे. बटर लावलेल्या 4 पैकी 2 स्लाईस घेवून त्याला वितळलेले चॉकलेट लावावे आणि बदामचे काप टाकून वरती बटर लावलेला ब्रेड स्लाईस ठेवून किंचित प्रेस करावे.
- बाहेरून थोडेसे बटर लावून सॅंडविच टोस्टरमध्ये सॅंडविच टोस्ट करून घ्यावे. जर टोस्टर नसेल तर सॅंडविच तव्यावर भाजावे. भाजताना किंचित दाब देउन दोन्ही बाजू लाईट ब्राऊन होईस्तोवर भाजावे.
- चॉकलेट सॉस, किसलेले चॉकलेट अणि चीज टाकून सँडविच खायला दया.
- डार्क चॉकलेट नसेल तर डैरीमिल्क चॉकलेट वापरू शकता.
- जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर चॉकलेट वितल्यास त्यात कन्डेंस्ड मिल्क टाकू शकता.
0 टिप्पण्या