गुजराती खांडवी /सुरळीच्या वड्या बनवण्याची विधी | Gujarati Khandavi recipe in Marathi

गुजराती खांडवी /सुरळीच्या वड्या
गुजराती खांडवी /सुरळीच्या वड्या

साहित्य:  
  • 1 वाटी बेसन
  • 1 वाटी आंबट ताक किंवा दही 
  • 1 वाटी पाणी
  • पाउण ते एक चमचा मिरचीचा ठेचा
  • 1 लहान चमचा हळद
  • 1/2 लहान चमचा हिंग
  • 2-3 चमचे तेल
  • चमचा मोहोरी
  • 1 चमचा तीळ
  • चिमूटभर हिंग
  • कढीपत्ता
  • किसलेला ओला नारळ
  • कोथिंबीर बारीक चिरलेली 
  • मीठ

कृती:
  1. एका भांड्यात बेसन व दही (ताक) घेऊन व्यवस्थित एकत्र करावे (गुठळ्या ठेवू नये). त्यात मिरचीचा ठेचा, हळद आणि हिंग घालावे. चवीपुरते मीठ घालावे. सर्व मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावे.
  2. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये सर्व मिश्रण घालावे. मध्यम आचेवर मिश्रण शिजेपर्यंत ढवळत राहावे, जर ढवळायचे थांबवले तर गुठळ्या होण्याची शक्यता असते. साधारण 15 मिनिटे नंतर हे मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करावा.
  3. मिश्रण दाटसर झाले कि एका ताटलीच्या मागच्या बाजूला तेल पसरून घ्यावे,  जास्त तेल लावू नये नाहीतर मिश्रण निट पसरणार नाही. त्यावर २-३ चमचे मिश्रण टाकून मिश्रण किंचीत थंड झाले की उलथन्याच्या सहाय्याने सर्वत्र पातळ पसरून घ्यावे आणि थोडे थंड होवू द्यावे.
  4. कढईत तेल गरम करावे त्यात मोहोरी, तील, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. आणि मिश्रणाच्या पातळ थरावर चमच्याने फोडणी पसरावी. 
  5. त्यावर किसलेले नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. नंतर सुरीने 5 इंच पट्ट्या कापाव्यात. त्याची सुरळी (गुंडाळी)करावी आणि मग त्या सुरळीचे 3-4 भाग करावेत.
  6. सर्व्ह करताना सुरळीच्या वड्यांवर थोडी कोथिंबीर आणि खवलेला नारळ टाकून आवडत्या चटणीसोबत खायला द्यावे.
टीप :
  1. मिश्रण तयार झाले का नाही हे ओळखण्यासाठी एका डिशच्या मागच्या बाजूला हे मिश्रण थोडेसे ओतून पसरावे व थंड झाल्यावर सुरीच्या सहाय्याने सुरळी होते का ते बघावे; जर सुरळी होत असेल तर गॅस बंद करावा अन्यथा मिश्रण ढवळत रहावे.
  2. सुरळ्या करायच्या आधी मिश्रणाच्या थरावर फोडणी घातली असल्याने वरून फोडणीची आवश्यकता नाही. पण जर आवडत असल्यास वरूनही थोडी फोडणी देऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या