Step by step Ragda Pattice recipe. रगडा पॅटिस बनविण्याची विधी.
पद्धत :
Ragda Pattice |
साहित्य :
पॅटीस
- 4 मध्यम आकाराचे बटाटे
- 2-3 हिरव्या मिरचा (ठेचून)
- 1 चमचा आले, लसूण पेष्ट
- मीठ
रगडा
- 2 वाटी हिरवे/ पांढरे वाटाणे (7-8 तास भिजवावे)
- 1 वाटी मोड आलेले मुग
- 1 मोठा कांदा (बारीक चिरून)
- 2 मध्यम टोमाटो (बारीक चिरून)
- 1 चमचा गरम मसाला
- 1 मोठा चमचा चिंचेचा रस
- 1 मोठा चमचा गुळ
- मीठ
- कोथिंबीर (बारीक चिरून)
- बारीक शेव
पद्धत :
कृती रगडा
- वाटाणा साधारण 7-8 तास भिजत ठेवा.
- आता वाटाणे कूकरमध्ये घेउन हळद , चवीनुसार मीठ घालून एकत्र करुन घ्या आणि 2-3 शिट्ट्या करुन घ्या.
- कढई मध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान रंग बदलेपर्यंत परतून घ्या नंतर टोमाटो, शिजलेले वाटाणे, मुग, चिंच , गुळ, मीठ, गरम मसाला, लाल मिरची पावडर व पाणी घालून जरा दबदबीत रगडा बनवावा.
कृती पॅटीस
- बटाटे उकडून घ्या ( 2 शिट्ट्या)
- उकडलेले बटाटे कुस्करून त्यामध्ये मिरच्या, आले, लसूण व मीठ घालून मळून घ्या व त्याचे एक सारखे चपटे गोळे बनऊन घ्या.
- तवा गरम करून पॅटीस शालो फ्राय करून घ्या. एका बाजूने लालसर रंग आलाकी दुसर्या बाजूनेसुध्दा लालसर रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करुन घ्या.
खायला देताना प्लेटमध्ये 2 पॅटीस घेऊन त्यावर 2 मोठे चमचे रगडा घालून वरतून कांदा, कोथिम्बीर, टोमाटो, बारीक शेव, चिंचेची चटणी व हिरवी पुदिन्याची चटणी घालून सर्व्ह करा.
0 टिप्पण्या