छोले | Chhole recipe in marathi

छोले | Chhole recipe in marathi
छोले | Chhole recipe in marathi
साहित्य: 

  • दिड कप काबुली चणे
  • 2 कांदा (बारीक चिरलेला) 
  • 2 टोमॅटो बारीक चिरलेला 
  • 1 चमचा छोले मसाला
  • 1/2 चमचा  जिरे
  • 1/4 चमचा हळद
  • 2 चमचा लाल तिखट
  • 1 चमचा आले पेस्ट
  • 1 चमचा लसूण पेस्ट
  • 1 चमचा आमचूर पावडर
  • 1 चमचा धणेपूड
  • तेल
  • कोथिंबीर
  • लिंबू
  • मीठ

कृती :

  1. चणे 9-10 तास भिजत घालावे. नंतर कूकरमध्ये 4 शिट्या करून चणे शिजवून घ्यावे, शिजवताना पाण्यात थोडे मिठ घालावे. चणे मऊसर शिजवावे. अगदी जास्त शिट्ट्या केल्या तर चणे फुटतात. त्यामुळे प्रत्येकाने घरातील कूकरचा अंदाज घेउन चणे शिजवावेत.
  2. चणे शिजले की कढईत तेल गरम करावे. त्यात जिरे, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. आले-लसूण पेस्ट घालून परतावे. कांदा परतावा. कांदा परतला की त्यात टोमॅटो घालावा. थोडी धणेपूड घालावी. मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे.
  3. टोमॅटो अगदी नरम झाला कि शिजलेले चणे घालावेत. चवीपुरते मीठ घालावे म्हणजे चणे शिजताना मीठ आत मुरते. आवश्यक तेवढे पाणी घालावे. मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी.
  4. 2-3 मिनीटांनी छोले मसाला आणि आमचूर पावडर घालून ढवळावे. जर मीठ किंवा तिखट कमी वाटत असेल तर वरून घालावे. थोडावेळ मंद आचेवर उकळू द्यावे.
  5. खासकरून छोले आणि भटुरे यांचे काँबिनेशन मस्तच लागते. तसेच छोले, लच्छा पराठा बरोबरही खायला छान लागतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या