- 1 कप गव्हाचे पीठ
- 1 कप मैदा
- 1/2 कप दूध
- चिमुटभर बेकिंग सोडा
- तेल
- मीठ
- कोथिंबीर (बारीक चिरलेली )
- एका भांड्यात सर्व साहित्य गव्हाचे पीठ, मैदा, बेकिंग सोडा, कोथिंबीर, आवश्यक तेवढे दूध आणि चवीपुरते मीठ घालुन कणिक चांगली मळुन घ्यावी.
- कणिक अर्धा तास झाकून भिजत ठेवावे.
- आता कणकेची पातळ चपाती बनवुन घ्या नंतर सुरीने ५ सेमी रुंदीच्या पट्ट्या कापाव्यात. त्याची सुरळी (गुंडाळी) करावी आणि त्याचा गोळा बनवावा.
- नंतर आपण चपाती करतो तशी लाटून तव्यावर छान दोन्ही बाजूने भाजून घ्या. तूप, तेल किंवा बटर तुमच्या आवडीनुसार भाजताना लावावे.
गरमागरम लच्छा पराठा, छोले सोबत सर्व्ह करा.
0 टिप्पण्या