एग फ्राइड राइस | egg fried rice recipe in marathi |
साहित्य :
- 1 कप तांदूळ
- 2 अंडे
- 1/2 कप कांद्याची हिरवी पात बारीक चिरून
- 1 चमचा सोया सॉस
- 1/2 चमचा काळी मिरी पावडर
- तेल
- चवीनुसार मीठ
कृती :
- तांदुळ स्वच्छ धुऊन किमान ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे.
- तांदळाच्या अडीच ते तीन पट पाणी घ्यावे, त्यात 1/2 चमचा तेल आणि पाऊण चमचा मीठ घालून मध्यम आचेवर गरम करत ठेवावे. पाणी उकळल्यास त्यात तांदूळ घालावे. वरुन झाकण ठेवून तांदूळ शिजू द्यावे. तेलामुळे भात मोकळा होतो. तांदूळ 70 - 80% शिजत आला की गॅस बंद करावा आणि उरलेले पाणी काढून घ्यावे. आणि तयार भात परातीत मोकळा करून थंड करत ठेवावे.
- एका भांड्यात अंडे फेटून घ्यावीत त्यात मीठ आणि काळी मिरी पावडर टाकावी आणि परत चांगले फेटून घ्यावे
- आता एका मोठ्या लोखंडी कढईत किंवा नॉनस्टिक कढईत 1 चमचा तेल गरम करून घ्या. त्यात मग फेटलेली अंडी ओतावीत आणि अंडा भुर्जी सारखे चांगले तळून घ्यावे. नंतर तळलेले अंडे बाजूला काढून ठेवावेत.
- तीच कढई चांगली तापू द्यावी व त्यात 1 चमचा तेल गरम करून घ्यावे त्यात तयार भात घालावा. त्यात थोडे मीठ आणि सोयासॉस घालावे. मध्यम गॅसवर ठेवून चांगले परतुन घ्यावे.
- भात कढईत असताना मध्यम आचेवर भातामध्ये तळलेले अंडे आणि कांद्याची हिरवी पात घालावी व चांगले मिक्स करावे. 2 - 3 मिनीटे परतावे. एग फ्राइड राइस तयार !!!
Read more Recipes : मेथी ठेपला | व्हाइट सॉस पास्ता | रेड सॉस पास्ता | चीज़ गार्लिक ब्रेड | व्हेज मोमोज
0 टिप्पण्या