भरली भेंडी | stuffed ladies finger recipe in marathi

महाराष्ट्रीय पाककृती भरली भेंडी
भरली भेंडी | stuffed ladies finger recipe in marathi
भरली भेंडी | stuffed ladies finger recipe in marathi
साहित्य:
  • पाव किलो भेंडी
  • 1/2 कप शेंगदाण्याचे कुट 
  • 1/2 कप किसलेले खोबरे 
  • 4 चमचे तीळ 
  • 1 चमचा लसूण बारीक चिरलेले 
  • 1 चमचा आद्रक बारीक चिरलेले 
  • 1 चमचा जिरेपूड
  • 1 चमचा धणेपूड
  • 1 चमचा गरम मसाला 
  • 1/4 चमचा हळद
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1/4 चमचा हिंग
  • चवीपुरते मिठ
  • तेल 

कृती:
  • भेंडी स्वच्छ घुवून, पुसून घ्यावी. भेंडीची देठं कापून घ्यावे. प्रत्येक भेंडीला एका बाजूने चिर द्यावी पण दोन तुकडे करू नयेत.
  • किसलेले खोबरे आणि तीळ भाजून घ्यावे 
  • एक भांड्यात भाजलेले खोबरे आणि तीळ, शेंगदाण्याचे कुट, लसुन ,आद्रक, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, हळद, लाल तिखट, चवीपुरते मिठ आणि हिंग एकत्र मिसळुन त्यात थोडे पाणी टाकुन एकजीव करुन घ्यावे. 
  • हे तयार मिश्रण प्रत्येक भेंडीमध्ये भरावे. अशाप्रकारे सर्व भेंडी तयार कराव्यात. उरलेला मसाला नंतरच्या वापरासाठी ठेवून द्यावा.




  • नॉनस्टिक पॅन गरम करावा. त्यात ३ टेस्पून तेल घालून गरम होवू द्यावे. नंतर त्यात भरलेली भेंडी घालावी. हलक्या हाताने, भरलेला मसाला बाहेर पडू न देता मिक्स करावे. ज्यामुळे तेल सर्व भेंडीला लागेल. गॅस एकदम मंद ठेवावा आणि वरून झाकण ठेवून भेंडी शिजू द्यावी. दर तीन ते चार मिनीटांनी भाजी हलक्या हाताने ढवळावी.
  • भेंडी शिजत आली कि उरलेला मसाला गरजेनुसार घालावा (हे पर्यायी आहे).

गरम गरम भरली भेंडी चपातीबरोबर सर्व्ह करावी.

Read more Recipes : कोल्हापुरी कटवड़ातिखट पुऱ्याउत्तपा  वडापाव मठ्ठा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या