मेथी ठेपला | Methi Thepla recipe in Marathi

मेथी ठेपला
मेथी ठेपला
साहित्य:

  • 1 कप बारीक चिरलेली मेथी
  • दीड कप कणिक
  • 1/4 कप बेसन 
  • 2 चमचे दही
  • 1/2 चमचा जिरे
  • 1/2 चमचा साखर
  • 1/4 चमचा ओवा
  • 1 चमचा जिरेपूड
  • 1/4 चमचा हळद
  • 1/2 चमचा लाल तिखट
  • 2-3 हिरव्या मिरच्या(बारीक चिरलेल्या )
  • कोथिंबीर 
  • तेल
  • चवीपुरते मिठ

कृती:

  1. एका भांड्यात चिरलेली मेथी आणि साधारण 1/2 चमचा  मिठ घालून किंचीत कुस्करून घ्यावी. 15-20 मिनीटे झाकून ठेवावे. थोड्यावेळात मेथीला किंचीत पाणी सुटेल.
  2. एका मोठ्या भांड्यात दही, साखर , चवीनुसार मीठ, हळद , लाल तिखट, हिरव्या मिरच्या, जिरे, ओवा, जिरेपूड आणि कोथिंबीर घालून नीट  नीट मिसळून घ्यावे. साखर पूर्ण विरघळली गेली पाहिजे . आता कुस्करलेली मेथीची पाने घालून नीट एकत्र करून घ्यावे. 
  3. आता त्यात गव्हाचे पीठ, बेसन आणि 1 टेबलस्पून तेल घालून नीट एकत्र मळून घ्यावे. हिरव्या पालेभाज्यांत भरपूर पाणी असते , म्हणून पीठ मळताना जास्त वरचे पाणी घालू नये . नाहीतर मळलेली कणिक ओलसर होते आणि ठेपले लाटायला कठीण होतात . जास्तीतजास्त पाव कप पाणी वापरून कणिक घट्ट मळावी . कणिक 20 मिनिटे झाकून ठेवावी.
  4. 20 मिनिटाने पिठ एकदा परत मळून घ्यावे आणि गोळे करून घ्यावे. तवा गरम करावा. पोळ्या करतो तसे लाटून घ्यावे. थोडे तेल घालून दोन्ही बाजू निट भाजून घ्याव्यात.
  5. गरम गरम थेपला सर्व्ह करावा. हा स्वादिष्ट नाश्ता गुजराती मेथी ठेपला लिंबाच्या गोड लोणच्यासोबत, टोमॅटो सॉस सोबत, दह्यासोबत , चटणीसोबत किंवा नुसतेच खायला ही फार छान लागतात ! डब्यासाठी तर उत्तमच !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या