तिखट पुऱ्या पाककृती मराठीमधे
Tikhat Purya |
साहित्य:
1 कप गव्हाचे पीठ
2 चमचे तांदुळाचे पीठ
2 चमचे बेसन
2 चमचे गरम तेल
1 चमचा धनेपूड
1 चमचा जिरेपूड
1/2 चमचा लाल तिखट किंवा चवीनुसार
1/4 चमचा हळद
कोथिंबीर
मीठ
तेल
कृती:
- एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन, आणि तांदुळाचे पीठ एकत्र करावे. त्यात मीठ, लाल तिखट, धने-जिरेपूड, हळद आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे.
- या मिश्रणात 2 चमचे गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्ट पीठ मळावे. 15 मिनिटे झाकून ठेवावे.
- कढईत मंद आचेवर तेल गरम करायला ठेवावे. बाजूला पीठाचे छोटे गोळे करावेत. या गोळ्यांच्या लाटून पुऱ्या कराव्यात. गॅस मिडीयम आणि हाय यांच्या मध्यावर आणावी. पुऱ्या दोन्ही बाजू पलटवून तळून घ्यावात.
- पुरी तळताना ती फुलावी म्हणून पुरीवर झाऱ्याने काळजीपुर्वक तेल उडवावे. पुरी सोनेरी रंगावर तळून घ्यावी.
- तिखट पुऱ्या गरम आणि गारही छान लागतात. 2-3 दिवस टिकतात म्हणून प्रवासात न्यायलाही चांगला पर्याय आहे.
Read more Recipes : मेथी ठेपला | पनीर टिक्का | वडापाव | कोल्हापुरी कटवड़ा | बटाटा चीज़ कॉर्न पराठा
0 टिप्पण्या