साधा आणि सोपा बिस्कीट पासून बनवलेला चॉकोलेट केक step by step -
बिस्कीट चॉकोलेट केक | Biscuit Chocolate cake recipe in marathi |
साहित्य :
- ६ बॉरबॉन बिस्कीटे (Bourbon biscuits) किंवा चॉकोलेट चे कोणतेही बिस्कीट
- १ कप दूध
- १ चमचा बेकिंग पावडर
- १/२ चमचा सोडा
- २ चमचे साखर (आवडीनुसार)
- तूप किंवा बटर
- १ चमचा मैदा
सजावटीसाठी (पर्यायी)
- ओरिओ बिस्कीट (Oreo biscuit)
- किट-कॅट चॉकोलेट (Kitkat chocolate)
- डैरीमिल्क चॉकोलेट (dairymilk chocolate)
- जेम्स (Gems)
कृती :
- बॉरबॉन बिस्कीटे आणि साखर मिक्सर मध्ये वाटुन बारीक पावडर करून घ्यावे.(बिस्कीट आधीच गोड असते त्याप्रमाणे साखर वापरावे )
- एका भांड्यात बिस्कीट आणि साखरची पावडर घेऊन त्यात दूध घालुन चांगले मिक्स करावे. मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. नंतर त्यात बेकिंग पावडर आणि सोडा टाकुन चांगले मिसळुन घ्या.
- कुकर गरम करायला ठेवा. कुकर ची शिट्टी काढून घ्यावी आणि कुकर मध्ये स्टॅन्ड ठेवावा.
- केकच्या भांड्याला तूप लावून घ्यावे नंतर त्यात मैदा टाकून भांडे हलवून घ्यावे. मैदा टाकल्यामुळे केक भांड्याला चिकटणार नाही.
- आता केकच्या भांड्यात केक चे मिश्रण टाकावे आणि कुकर मध्ये ठेवून २०-२५ मिनिटे केक बेक होऊ द्यावे. २० मिनिटांनंतर केक चेक करत राहा.
- चॉकोलेट केक थंड झाल्यास त्यावर हवे तसे सजावट करा.
बिस्कीट चॉकोलेट केक | Biscuit Chocolate cake recipe in marathi |
0 टिप्पण्या